आधुनिक तंत्रामुळे वंध्यत्वाचे निवारण शक्य - डॉ. पवार
पाळी बंद झाली परंतु स्त्री बीज उपलब्ध असल्यामुळे चाळीशी नंतरही आपत्य प्राप्ती झाली अशा चार महिलांनी डॉ. प्रदीप पवारांकडे वंध्यत्व निवारण करुन घेतले. टेस्ट ट्यब बेबीचा प्रयोग डॉ. पवारांकडे यशस्वी होत असन नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध करणारे डॉ. प्रदीप पवारांचे "विदला नर्सिंग होम" नाशिक मधील पहिलेच होय.वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असले तरी गेल्या ३ वर्षात उपचार केलेल्या १५०० जोडप्यांमध्ये ७५ टक्के जोडप्यांत वंध्यत्व निवारण्यात यश आले. अशी माहिती नासिक येथील ख्यातनाम वंध्यत्व निवारण व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रदिप पवार वडॉ. सौ. सवर्णा पवार यांनी अर्थ-उद्योगशी बोलतांना दिली. वंध्यत्व निवारण्यासाठी उपचार घेणाऱ्या अनेक जोडप्यांमध्ये लवकर तर काहींमध्ये ६ महिने ते १ वर्षात वंध्यत्व निवारण होते. त्यामुळे अशा काही जोडप्यांनी उपचार घेत असतांनाच्या काळात थोडा संयम दाखवावा, उपचार पूर्ण करुन घ्यावेत असेही डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले एखाद्या जोडप्यास विवाहानंतर किमान १ वर्षाचा सहवास लाभला व त्यांनी जर कोणतेही कटुंब नियोजनाचे साधन वापरले नसेल तर कुणात त तरी वंध्यत्व असू शकते. अशा जोडप्यांनी त्याची कारणे शोधावीत अशा जोडप्यांतील १०० पैकी ८५ जोडप्यात किमान वर्षभरात वंध्यत्व निवारण शक्य असते. अपत्य प्राप्ती नसलेल्या १०० जोडप्यांपैकी ४० टक्के परुषात ३० टक्के स्त्रियांत तर ३० टक्के दोघांमध्ये वंध्यत्वाचा दोष असतो. पुरुषांमधील दोषाचे कारण लैंगिक, मानसिक ताण-तणाव, आहार-विहार, वाढते शहरीकरण व व्यभीचार यापैकी अस शकते तर स्त्रियांमध्ये गर्भपिशवीच्या संदर्भातील कारणे असू शकतात. यांपैकी ज्या स्त्रीत गर्भपिशवी नसते तिला टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्राने आपत्य प्राप्ती करून घेता येवू शकते. नुकत्याच नाशिक मधील पहिल्या वहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा (जुळे) नाशिकमध्ये डॉ. पवार यांच्या हॉस्पिटल मध्ये जन्म झाला. याशिवाय महिलांची पाळी बंद झाली आहे. अशा महिलांनाही त्यांची मानसिक तयारी असेल तर स्त्रीबीज दनाशिकमधील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचे क्रिएटर डॉ. प्रदिप पवार व डॉ. सौ. सुवर्णा पवार जुळे असलेल्या टेस्टट्यूब बेबींसह नाही. व रुग्ण ४८ देवून अपत्य प्राप्ती करून घेता येवू शकते त्यामुळे शास्त्राने वंध्यत्वावर मात केली आहे असे म्हणता येईल. पाळी बंद झाली परंतु स्त्री बीज उपलब्ध असल्यामुळे चाळीशी नंतरही अपत्य प्राप्ती झाली अशा चार महिलांनी डॉ. प्रदीप पवारांकडे वंध्यत्व निवारण करुन घेतले. टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग डॉ. पवारांकडे यशस्वी होत असन नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध करणारे डॉ. प्रदीप पवारांचे "विदला नर्सिंग होम" नाशिक मधिल पहिलेच होय. ह्या तंत्राद्वारे आतापर्यंत अनेक महिलांना गर्भधारणा झाली असून या पैकी पहिल्या बाळाचा जन्म नुकताच झाला आहे. डॉ. प्रदीप पवार गेल्या चार पाच वर्षांपासून एन्डोस्कोपी सर्जरी करीत असून अवघ्या पाच मी. मी. ते एक सेंटी मीटर आकाराची ही शस्त्रक्रिया असते. टाके कमी राहत असल्यामळे ह्या शस्त्रक्रियेत वेदना होत नाही.
व रुग्ण ४८ तासानंतर घरी जाव शकतो, असेही डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले याशिवाय भविष्यात काही असाध्य रोगांवर क्लोनिंगचे तंत्र यशस्वी ठरु शकेल असे मत हो प्रदीप पवार यांनी व्यक्त केले. मात्र त्यावर संशोधन सरु असन भारतात अद्याप त्या संदर्भातील प्रयोग होत नाही. क्लोनिंग तंत्राद्वारे बाधीत भागातील पेशी ह्युमन जिन्सद्वारा रिप्लेस केल्या जातात. या संदर्भातील कोणतेही ऑरगान तयार करता येईल असे डॉ. पवार यांनी सांगितले. डॉ. प्रदीप पवार गेल्या चार वर्षांपासून नाशिक येथे सिमेन बैंक चालवित असून ही सुविधा उपलब्ध करणारे ते नाशिक मधील पहिले स्त्रीरोग तज्ञ आहेत. सिमेन बैंकद्वारा २० वर्षापर्यंत विर्याची साठवण करता येते. लष्करातील जवानांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होव शकतो. तसेच विर्यदानही करता येव शकते. डॉ. सवर्णा पवार यांचीही डॉ. प्रदीप पवार यांना मोलाची मदत होत असून त्या सेक्स विषयक सल्ला देतात. आपल्या यशात सौ. सुवर्णा यांचा मोठा वाटा आहे असे यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले. साहित्याची विशेष रुची असणाऱ्या डॉ. पवारांना सामाजिक प्रश्नांची जाण असून वैद्यकीय यशाकडे ते केवळ कमवण्याचे साधन म्हणून पाहत नाहीत. सेवाभावी वृत्तीने ते कार्यरत असून दर गुरुवारी मोफत रुग्ण तपासणी नियमाने करतात. त्यांच्या या सेवेचा अनेक गरजू रुग्णांनी लाभघेतला आहे.
चाराचे दोन करुन सुखरुप बाळंतपण चाराचे दोन करुन सुखरुप बाळंतपण अलिकडेच डॉ. सवर्णा पवार व डॉ. प्रदीप पवार यांच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये एम्ब्रीयो रिडक्शन या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन चार गर्भापैकी दोन गर्भकमी करुन जळ्यांचा यशस्वी स्त्रीबीज व शक्राण यांचे मीलन घडवन त्यांची वाढ दोन ते पाच दिवस प्रयोगशाळेतच करून ते परत स्त्रीच्या गर्भाशयात ठेवतात. अशावेळी तीन ते चार गर्भ गर्भाशयात सरकविले जातात. यामळे गर्भधरणाची शक्यता वाढते. परंतु सर्वच गर्भ जर गर्भाशयाने रुजविल्यास नवीनच समस्या तयार होते. तीन किंवा चार गर्भ एकाच वेळी वाढवल्यास गर्भपात, अपुऱ्या दिवसाची प्रसुती व कमी वजनाची बाळे असे धोके संभवतात. त्याचबरोबर बाळंतपणा नंतर सर्वांचे संगोपन करणेही एकट्या मातेस अशक्य होते. या समस्येसाठी आता एम्ब्रीयोरिडक्शन या तंत्राने जादा गर्भ काढून टाकता येतात. नुकतेच सौ. कलकर्णी (नाव बदललेले) यांचे टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रीया करुन घेतल्यानंतर रुजलेल्या चार गर्भापैकी दोन गर्भ कमी करण्यात आले. या पध्दतीमध्ये साधरणतः दोन ते अडीच महिन्याच्या सुमारास सोनोग्राफी तंत्राचा वापर करुन, एका विशिष्ट प्रकारच्या सुईने पोटॅशियम क्लोराइडचे इंजेक्शन थेट गर्भाच्या हृदयात टोचले जाते. काही क्षणात त्या गर्भाची हृदयक्रिया बंद पडते, काही दिवसात ह्या गर्भाचे अवशेष विरघळून जातात आणि उरलेल्या गर्भाना व्यवस्थित वाढ होण्यासाठी जागा मोकळी होते. मुंबई, पुण्यानंतर प्रथमच ह्या तंत्राचा वापर करुन चाराचे दोन करुन जळ्यांचा जन्म झाला. मुलगा, मुलगी आणि त्यांची माता सर्व सखरुप आहेत असे डॉ. पवार यांनी बोलताना सांगितले.
या प्रक्रीयेत डॉ. अनील घोलप, श्री. प्रकाश कलकर्णी रिप्रॉडक्टीव बायोलॉजिस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे ही डॉ. प्रदीप पवार यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील पहिले टेस्ट ट्यब जळे टेस्ट ट्यूब पध्दतीद्वारे अपत्य प्राप्ती हा ध्दतीमध्ये अपत्यय प्राप्ती हा वंध्यत्वावरचा सर्वात चांगला उपाय ठरला आहे. महत्वाचे म्हणजे पर्वी हा प्रयोग मंबई, पणे सारख्या मोठ्या शहरांतच सिद्ध होत असे. परंत नाशिकलाही हा प्रयोग सफल झाला असन, त्याचा मान. प्रदीप पवार व डॉ सौ सवर्णा पवार आहे. नाशिक येथील जाधव नावाच्या दाम्पत्यास या पध्दतीने अपत्य प्राप्ती झाली.
विशेष म्हणजे हे टेस्ट ट्यूब बेबीज जळे असून दोन्हीही मले आहेत. या दोन्ही बाळांची आणि आईची तब्येत चांगली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतांना डॉ. प्रदीप पवार म्हणाले, संबंधित दाम्पत्यास मल बाळ नव्हते. त्यांच्या तपासणीनंतर त्यांच्यासमोर टेस्ट ट्यूब बेबीचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी त्यास मान्यता दिली. नंतर काही संप्रेरक देऊन अनेक स्त्रीबीजे तयार करून सोनोगाफीच्या साहाय्याने ती शरीराबाहेर काढण्याची प्रक्रिया करण्यात आली. पतीच्या वीर्यातील चांगल्या प्रतीचे शुक्रजंतू निवडून त्यांचा स्त्रीबीजाबरोबर संयोग घडवून आणला गेला. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड व बाष्प यांचे योग्य प्रमाण असलेल्या इनक्युबेटरमध्ये ३७अंश तपमान असलेल्या कल्चर मिडियममध्ये ठेवन वाढविण्यात आली. ४८ तासांनंतर फलीत झालेली अंडी अत्यंत नाजकपणे गर्भाशयात सोडली गेली. यानंतर सौ. जाधव यांच्या पोटात नैसर्गिकरित्या गर्भाची उत्तम वाढ झाली. त्यांची तब्येतही शेवटपर्यंत व्यवस्थित राहिली. त्यानंतर त्यांनी निरोगी जुळ्यास जन्म दिला.
नाशिक जिल्ह्यातील पहिली टेस्ट ट्यब जन्माला येण्यामागे डॉ. प्रदीप व सवर्णा पवार यांच्याबरोबर, डॉ. श्रेयस पाडगांवकर, डॉ. अनिल घोलप, डॉ. विजय देवरे, बायोलॅजिस्ट प्रकाश कळकर्णी व विदला नर्सिंग होमच्या डॉ. योगीता कोतवाल, ज्ञानेश्वर तिदमे, सिस्टर नीलिमा यांचाही मोलाचा वाटा आहे.