डॉ. प्रदीप पवार : एक चतुरस्त्र व्यक्तीमत्त्व
वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत नावाजलेले, सामाजिक वाटेवर आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर शेकडो माणसं जोडणारे, राजकीय वाटेवर एकनिष्ठ राहून सक्रीय राहणारं व्यासंगी व्यक्तीमत्त्व म्हणून डॉ. प्रदीप पवार यांची ओळख संपूर्ण जिल्ह्याला ओळख आहे. आज डॉ. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाटचालीचा मागोवा घेणारा हा लेख...डॉ. प्रदीप पवार हे नाशिकमधले प्रसिद्ध स्त्रीरोग तज्क्ष. उत्तर महाराष्ट्रातील पहिले आईव्हीएफ (वंध्यत्त्व निवारण) सेंटर त्यांनी सुरू केल आणि कितीतरी कुटुंबांमध्ये आनंद फुलवला. वडील कै. एन. के. (दादा) पवार हे व्रतस्थ शिक्षक होते. कडक शिस्तीच्या पवार सरांना पाहताच विद्यार्थी धूम ठोकत. माजी विद्यार्थीसुद्धा बिचकून असत. पवार सरांनी लाखो विद्यार्थी घडवले. मार्ग वेगळा असला तरीही अशा पद्धतीने डॉ. प्रदीप पवार नाशिक जिल्ह्यातील लाखो कार्यकर्ते घडवत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये डॉ. प्रदीप पवार यांच्याविषयी आम्हा कार्यकर्त्यांमध्ये एक आदरयुक्त भीती आहे. डॉक्टर म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांचे आयडॉल. नाशिक जिल्ह्याने वैद्यकीय क्षेत्रात जी उंची गाठली, त्यात डॉक्टर प्रदीप पवार यांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. उत्तर महाराष्ट्रातलं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आणि वंध्यत्व निवारण केंद्र सुरू करून प्रदीप पवारांनी अनेक दापत्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला. शिस्त आणि पारदर्शकता या दोन तत्त्वांवर आपली वैद्यकीय सेवा करताना डॉक्टर पवारांनी अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. एखाद्याला मदत करायची असल्यास कुणालाही न सांगता सढळ हाताने करणार आणि मदत केल्यावर त्याची कुठे वाच्यताही होऊ देणार नाही. त्यांच्या या वैशिष्ट्यांचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे म्हणूनच त्यांच्या सावलीत आमच्यासारखे कार्यकर्ते आज मोठे आणि सुजाण होऊ शकले.
काम कोणतंही असो, डॉक्टर पवार ते फत्ते करतीलच, यात शंकाच नाही. त्यांचा सक्सेस रेशो खरंतर खूप आहे. त्यांच्या कुटुंबातच समाजसेवेचा वारसा आहे. मात्र, ही समाजसेवा कधीही दिखाऊ स्वरुपाच नव्हती. डॉक्टरांनीही वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्याचे कडूगोड अनुभव घेत वाटचाल केली. समाजाची दुःखं अधिक जवळून जाणून घेता येतील, ती दूर करता येतील या हेतूने त्यानी वैद्यकीय सेवेला प्राधान्य दिलं. डॉक्टरांची खासियत म्हणजे ते मनसे प्रमुख राज ठाकरेंसारखेच व्यासंगी आहेत. एखादा विषय समजून घेतल्यानंतरच पराड भूमिका मांडणार, राजकारणी माणूस म्हणजे चंचल समजला जातो. मात्र, डॉक्टर राजनिष्ठ राहिले, उत्तर महाराष्ट्रातल्या पक्षवाढीसाठी डॉक्टर नेहमीच अग्रेसर असतात. त्यांचं कर्तृत्व, चतुरख आणि ऊर्जावान व्यक्तिमत्त्य प्रत्येक कार्यकर्त्याला सतत प्रेरणा देत असतं. सामान्य कार्यकत्यांचे गुण ओळखून डॉक्टर त्याला पक्षकार्याची संधी देतात. आपलं कुटुंब आणि उदरनिर्वाहाची व्यवस्था सांभाळून समाजसेवा करा, असं ते नेहमीच सांगतात. आम्हा कार्यकर्त्याचा आधारस्तंभ, समाजशास्त्राचे विद्यापीठ असलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला जन्मदिनी अनंत शुभेच्छा!